निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा दाखला देत हा खासदार म्हणाला, ‘ते तर अर्धवटराव आणि अविचारी’
निवडणूक आयोगाने आम्हाला वेगळा पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. आमच्या पक्षाचे आठ खासदार आहेत. लोकसभा अध्यक्ष यांना आम्ही आमच्या गटाच्या अनुषंगाने वेगळी पत्र देत असतो. लोकसभा अध्यक्ष यांच्याकडे आम्ही वेगळी नोंद केली आहे. त्यामुळे व्हीप बजावण्याचा मुर्खपणा त्यांनी केला तसा आम्ही करत नाही.
मुंबई : 27 सप्टेंबर 2023 | लोकसभेत महिला आरक्षणाच्या विधेयकावरून शिंदे गटाच्या मुख्य प्रतोद भावना गवळी यांनी ठाकरे गटाच्या खासदारांना व्हीप बजावला. मात्र, यावरून ठाकरे गटाच्या खासदारांनी त्यांना अविचारी आणि अर्धवटराव म्हटलय. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी निवडणूक आयोगाचा दाखला दिला. निवडणूक आयोगाच्या निर्णयाप्रमाणे उबाटा आणि शिंदे गट हे वेगवेगळे पक्ष आहेत. त्यामुळे आम्हाला व्हीप बजावण्याचा मूर्खपणा ज्यांनी केला त्यांच्या अकलेचे दिवाळे निघाले आहे असा टोला विनायक राऊत यांनी लगावला. आमचा महिला विधेयकाला विरोध नाही तर समर्थन आहे. मात्र, महिलांना फसविण्याचा धंदा महिला विधयकाच्या माध्यमातून मोदी सरकार करतंय असा आरोपही त्यांनी केला. निवडणुकीच्या तोंडावर वेगवेगळ्या घटकांना प्रलोभन दाखवण्यासाठी केलेला हा आटापिटा आहे. अशी टीकाही राऊत यांनी केलीय. त्यांनी बजावलेल्या व्हीपला आम्ही कचऱ्याची टोपली दाखवू. यापूर्वीही त्यांनी असा प्रयत्न केला होता. पण, आम्ही त्यांना उत्तर देण्यास बांधील नाही असे ते म्हणाले.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

