शिवसेनेतील दोन नेत्यांमध्ये बिनसलं, कीर्तिकरांना ‘मातोश्री’वर लोटांगण घालण्याची घाई, त्यांची हकालपट्टी करा; कुणाची शिंदेंकडे मागणी?
'मतदानाच्या दिवशीच गजानन कीर्तिकर यांच्या पत्नीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख केला. इतकंच नाहीतर गजानन कीर्तिकर यांचा खासदार निधी अमोल कीर्तिकर यांनी प्रचारासाठी आणि विकासकामांसाठी वापरला. अमोल हे गजानन कीर्तिकर यांच्या कार्यालयातून कारभार करत होते, यामुळे ठाकरे गटाला फायदा...'
शिवेसेनेचे नेते गजानन कीर्तिकर यांची पक्षातून हकालपट्टी करा, शिंदे गटाचे उपनेते शिशिर शिंदे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली आहे. मतदानाच्या दिवशी गजानन कीर्तिकर यांच्यासह त्यांच्या पत्नीने पक्ष विरोधी वक्तव्य करून उद्धव ठाकरे यांची बाजू घेतल्याचे या पत्रात शिशिर शिंदे यांनी म्हटले आहे. मतदानाच्या दिवशीच गजानन कीर्तिकर यांच्या पत्नीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख केला. इतकंच नाहीतर गजानन कीर्तिकर यांचा खासदार निधी अमोल कीर्तिकर यांनी प्रचारासाठी आणि विकासकामांसाठी वापरला. अमोल हे गजानन कीर्तिकर यांच्या कार्यालयातून कारभार करत होते, यामुळे ठाकरे गटाला फायदा झाला, असल्याचे शिशिर शिंदे यांनी म्हटले. इतकं च नाहीतर गजानन कीर्तिकर यांचे उद्योग पक्षाला बदनाम करत आहेत. तर गजानन कीर्तिकर यांना मातोश्रीवर लोटांगण घालण्याची घाई झाली आहे, असेही त्यांनी म्हटले आणि गजानन कीर्तिकर यांच्या हकालपट्टीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली.
Published on: May 22, 2024 04:12 PM
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
