AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Fast News | महत्वाच्या बातम्या | 7 October 2021

Fast News | महत्वाच्या बातम्या | 7 October 2021

| Edited By: Harshada Bhirvandekar | Updated on: Oct 07, 2021 | 3:57 PM
Share

लखीमपूर हिंसाचार प्रकरणावरुन महाविकास आघाडी सरकारनं आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळतंय. या हिंसाचाराच्या निषेधात 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलीय.

येत्या 11 ऑक्टोबर रोजी होणारा महाराष्ट्र बंद हा राजकीय नसून संवेदनशीलतेसाठी आहे. शेतकऱ्यांप्रती संवेदना दाखवणारा आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठी आहोत हे दाखवून देण्यासाठी आहे. तसेच लखीमपूर खिरी येथे झालेल्या हिंसेचा धिक्कार करण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे, असं सांगतानाच या घटनेतील आरोपींना सरकार का वाचवत आहे? कुणासाठी वाचवत आहे, असा संतप्त सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. लाखीमपूर खिरी या ठिकाणी शेतकऱ्यांना चिरडण्यात आलं. त्याची सर्वोच्च न्यायालयाने स्यूमोटोद्वारे दखल घेतली आहे. त्यावर सुनावणी सुरू आहे. जे यात मृत झाले त्यांना न्याय मिळेल. केंद्र सरकार कोणती माहिती लपवत आहे. आरोपींची नाव ओळख निष्पन्न झाली आहेत तरी त्यांना का अटक केल्या जात नाही? असा सवाल राऊत यांनी केला आहे.

दरम्यान, लखीमपूर हिंसाचार प्रकरणावरुन महाविकास आघाडी सरकारनं आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळतंय. या हिंसाचाराच्या निषेधात 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलीय. हा बंद महाविकास आघाडी सरकारकडून म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेनं पुकारण्यात आल्याचं जयंत पाटील यांनी काल सांगितलं होतं. तसंच अन्य मित्र पक्षांशीही बोलणं सुरु असल्याचं पाटील यांनी सांगितलं.

Follow Us
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या