VIDEO : Fast News | महत्त्वाच्या घडामोडी | 1:30 PM | 8 November 2021

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ त्यांच्या सामाजिक कामांनी आणि लोकोपयोगी भूमिकांनी सतत चर्चेत असतात. कोरोना काळात खुद्द भारताच्या पंतप्रधानांनी त्यांचं कौतुक केलं. आता पुन्हा एकदा त्यांच्या नव्या आवाहनाने त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त पुणेकरांना एक पत्र लिहिलं आहे.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ त्यांच्या सामाजिक कामांनी आणि लोकोपयोगी भूमिकांनी सतत चर्चेत असतात. कोरोना काळात खुद्द भारताच्या पंतप्रधानांनी त्यांचं कौतुक केलं. आता पुन्हा एकदा त्यांच्या नव्या आवाहनाने त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त पुणेकरांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रातून त्यांनी पुणेकरांना विशेष आवाहन केलंय. मला वाढदिवसाला हारतुरे, केक, भेटवस्तू नकोत. पुण्यात रक्ताचा तुटवडा आहे. कृपया आपण रक्तदान करुन मला शुभेच्छा द्याव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलीय. महापौर मुरलीधर मोहोळ उद्या 9 नोव्हेंबर रोजी आपला 47 वा वाढदिवस साजरा करतायत. राजकीय नेते मंडळींचा वाढदिवस म्हणजे शुभेच्छांचे शेकडो फ्लेक्स, हजारोंची गर्दी,पार्ट्या, जेवणावळी, पण पुण्याचे महापौर याला अपवाद आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI