दिल्लीत महायुतीच्या जागांचा फॉर्म्युला ठरणार,नेत्यांची अमित शाहसोबत अंतिम बैठक
महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणूकांचे बिगुल फुंकण्यात आले आहे. येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्रात निवडणूक होणार आहे. या निवडणूकीसाठी महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा येत्या दोन दिवसात सुटण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकांची घोषणा काल निवडणूक आयोगाने केली आहे. त्यानुसार येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात निवडणूका होणार आहेत. तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल येणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीचा जागा वाटपाचा फार्म्युला दिल्लीत ठरणार आहे. यासाठी देवेंद्र फडणवीस भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीसाठी आजच दिल्लीला जाणार आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा यांची शाहांसोबत दिल्लीत बैठक होणार आहे. जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यासाठी ही अंतिम बैठक होण्याची शक्यता आहे. त्यानंतर येत्या दिवसात महाराष्ट्रातील महायुतीचे जागावाटप जाहीर होणार असल्याचे म्हटले जात आहे.
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश

