Vijay Shah : सोफिया कुरेशींबद्दल वादग्रस्त वक्तव्य, भाजप मंत्र्यावर गुन्हा अन् सुप्रीम कोर्टात धाव; नेमकं काय म्हटलं होतं?
उच्च न्यायालयाने याप्रकरणी स्वतःहून दखल घेत या प्रकरणात कोणत्याही परिस्थितीत एफआयआर नोंदवला पाहिजे, असे म्हटले होते.
कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल भाजपचे कॅबिनेट मंत्री विजय शाह यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्यानंतर देशभरातून संतापाची लाट उसळली होती. सोफिया कुरेशी या ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या कर्नल आहेत. दरम्यान, कर्नल सोफिया कुरेशींबद्दल वादग्रस्त विधान केल्याबद्दल मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने विजय शाह यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर विजय शाह यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
विजय शाहांच वक्तव्य काय?
भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये सक्रिय सहभाग असलेल्या कर्नल सोफिया कुरेशींवर विजय शाह यांनी अप्रत्यक्षपणे भाष्य केल्याचे पाहायला मिळाले होते. विजय शाह यांनी पंतप्रधान मोदींनी “दहशतवाद्यांच्या बहिणीला लष्करी विमानातून हल्ल्यासाठी पाठवले” असे विधान केले होते. रविवारी इंदूरमधील महू येथील रायकुंडा गावात एका कार्यक्रमात बोलत असताना मंत्री विजय शाह यांनी वादग्रस्त विधान केलं. मंगळवारी हा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांना दहशतवाद्यांची बहीण म्हटले असल्याचे सांगितले जात आहे.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?

