Bhiwandi | भिवंडीमध्ये फर्निचरच्या शोरुमसह कारखान्यास भीषण आग, लाखोंचे नुकसान

भिवंडी तालुक्यातील कशेळी येथील चामुंडा कॉम्प्लेक्समधील काईट फर्निचर या शोरूमसह कारखान्यास मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. भिवंडी ठाणे अग्निशामक दलाच्या चार गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: prajwal dhage

Jan 28, 2022 | 9:33 AM

ठाणे : भिवंडी तालुक्यातील कशेळी येथील चामुंडा कॉम्प्लेक्समधील काईट फर्निचर या शोरूमसह कारखान्यास मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. भिवंडी ठाणे अग्निशामक दलाच्या चार गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सहा तासांनी ही आग आटोक्यात आली आहे .दरम्यान या आगीत शोरूममधील महागडे फर्निचर व फर्निचर बनविण्याचा कच्चा माल, लाकूड, प्लायवूड, फोम, कापूस मोठ्या प्रमाणावर जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें