Marathi News Videos Former Labor Minister NCP MLA Hasan Mushrif ED Bombay High Court Bombay Sessions Court Anticipatory Bail Application

मुश्रीफांना दिलासा; कारवाई न करण्याचेही निर्देश
ईडीच्या कारवाईनंतर मुश्रीफ यांनी मुंबई उच्च न्यायालयात नव्याने रिट याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी पार पडली.
मुंबई : माजी कामगार मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत असतानाच आता दिलासा देणारी बातमी आली आहे. ईडीच्या कारवाईनंतर मुश्रीफ यांनी मुंबई उच्च न्यायालयात नव्याने रिट याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने मुश्रीफ यांना दिलासा देत ईडीच्या प्रकरणात पुढील दोन आठवडे अटकेची कारवाई न करण्याचे निर्देश दिले आहेत. याचबरोबर मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज करण्याचे निर्देशही मुश्रीफांना हायकोर्टाने दिले आहेत. मात्र गुन्हा रद्द करण्यासाठीच्या याचिकेवरील सुनावणी तूर्तास तहकूब करण्यात आली आहे.
Published on: Mar 14, 2023 1:57 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
श्रुती मराठेला विद्याधर जोशींचं थेट प्रत्युत्तर, म्हणाले, मला वाजवणं..
माळेगाव साखर कारखान्याच्या सभेत सुनेत्रा पवारांसमोरच सभासदांचा गोंधळ!
गुलाबाचं रोप कोणत्या महिन्यात लावणे फायदेशीर ठरते?
काय बोलाचा हेंका?? मंगळसूत्रावरून ट्रोल करणाऱ्यांना अंकिताने सुनावलं
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्याला मोठा दिलासा, केंद्राचा मोठा निर्णय
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..