Ganesh Chaturthi 2023 | मुंबईतील सर्वात श्रीमंत GSB गणपतीला ‘इतक्या’ कोटींचे विमा कवच
VIDEO | मुंबईतील सर्वात श्रीमंत असणारा बाप्पा म्हणजे जीएसबी गणेशोत्सव सेवा मंडळाचा गणपती बाप्पा. यंदा या गणेशोत्सव मंडळाकडून एकूण 360 कोटी रुपयांचे गणपती बाप्पाला विमा संरक्षण कवच काढण्यात आले
मुंबई, १८ सप्टेंबर २०२३ | जीएसबी सेवा मंडळ विश्वाचा राजा गणपतीचे प्रथम दर्शन नुकतेच पार पडले आहे. यावर्षी मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा करणार असल्याचे यावेळी मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे. दरवर्षीच या विश्वाचा राजा गणपतीला सोन्याची मोठी भर पडत असते. त्याचप्रमाणे यावर्षी देखील अधिकच्या सोन्याचे दान या बाप्पाच्या चरणी पडलेले आहे. तसेच यावर्षी नव्याने 36 किलो चांदीच्या प्रसादाच्या भांड्यांची भेट स्वरूपात दान मिळाले आहे. त्याचबरोबर यावर्षी या गणेशोत्सव मंडळाकडून एकूण 360 कोटी रुपयांचा विमा देखील बाप्पाचा काढण्यात आलेला आहे. सुरक्षितेच्या दृष्टीतून अधिकच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून सर्व भाविकांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. यावर्षी जीएसबी सेवा मंडळाकडून फेस डिटेक्टर देखील लावण्यात आलेले आहेत. बघा आणखी काय तयारी करण्यात आली आहे.
Latest Videos
Latest News