Konkan Railway | सलग दुसऱ्या दिवशी कोकण रेल्वे कोलमडली, काय कारण अन् किती तास उशिराने धावतेय ट्रेन?
VIDEO | गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आल्याने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची दिवा रेल्वे स्थानक आणि लोकमान्य टिळक टर्मिनसवर मोठी गर्दी पण कोकण रेल्वेचं वेळापत्रक दुसऱ्या दिवशीही कोलमडलं
ठाणे, १७ सप्टेंबर २०२३ | दरवर्षी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या वाढताना दिसत आहे. गणपती बाप्पाचे आगमन अवघ्या दोन दिवसांवर आल्याने गेल्या दोन दिवसांपासून चाकरमान्यांनी कोकणाची वाट धरली आहे. त्यामुळे दिवा रेल्वे स्थानक आणि लोकमान्य टिळक टर्मिनसवर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. दरम्यान, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी स्पेशल ट्रेन सोडण्यात आल्या आहेत. मात्र गणपती स्पेशल ट्रेनमुळे कोकण रेल्वेचं वेळापत्रक सलग दुसऱ्या दिवशी कोलमडलं आहे. यामुळे अनेक गाड्या अर्धा ते 4 तासांपर्यंत उशिराने धावत आहेत. तर कोकणात जाण्यासाठी दिवा रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. दिवा-रत्नागिरी पॅसेंजरला प्रचंड गर्दी झाली असल्याचे पाहायला मिळत आहे, यामुळेच कोकण रेल्वेचे वेळापत्रक पुन्हा कोलमडलं आहे.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात

