राज्यात थंडीमुळे लोक गारठले; फळांच्या दरात वाढ, विजेच्या दर वाढीचाही लागणार शॉक… यासह पाहा गाव सुपर फास्ट बातम्या

अस्लम अब्दुल शानेदिवाण, Tv9 मराठी

|

Updated on: Jan 09, 2023 | 9:59 AM

राज्यात थंडीमुळे लोक गारठले असतानाच फळांना चांगला मिळत आहे. वाढत्या थंडिमुळे फळांच्या दरात वाढ झाली आहे. अननस, सिताफळ आणि सफरचंदच्या दरात वाढ होताना दिसत आहे.

मुंबई : महागाईमुळे नोकरदारांसह सर्वसामान्यांना देखिल फटका बसत आहे. त्यातच आता महाव्तरण कंपनीकडून देखि सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावण्याचे तर विजेचे शॉक देण्याचे धोरण दिसत आहे. माहावितरण कंपनीकडून राज्य शासनास विजेचे दर वाढ करण्यासंदर्भात प्रस्ताव देण्यात आला आहे.

माहावितरण कंपनीकडून राज्य शासनास २.३५ रूपयांनी विजेची दर वाढ करण्याची प्रस्ताव देण्यात आला आहे. यादरम्यान राज्यात होत असणाऱ्या हवामान बदलाचा फटका ही बसताना दिसत आहे. पुढील दोन दिवसात मुंबईसह राज्यातील पारा आणखीन घसरणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्यात थंडीमुळे लोक गारठले असतानाच फळांना चांगला मिळत आहे. वाढत्या थंडिमुळे फळांच्या दरात वाढ झाली आहे. अननस, सिताफळ आणि सफरचंदच्या दरात वाढ होताना दिसत आहे. यासह आणखीन महत्वाच्या अपडेट घ्या गाव सुपर फास्टमध्ये….

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI