सुरेंद्रकुमार अकोडे, TV9 मराठी, प्रतिनिधी, अमरावती : प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी एका स्थानिकाला कानशिलात लगावल्याचं समोर आलं. त्यानंतर त्यावर आता प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. भाजपचे सरचिटणीस गोपाल तिरमारे यांनी बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्यावर टीका केली आहे. गावकऱ्याला मारहाण करणं ही बाब अत्यंत निंदनीय आहे. बच्चूभाऊंनी आपल्या रागावर नियंत्रण आणावं. त्यांना मंत्रिमंडळामध्ये मिळाल्याने त्यांचं मन विचलित झालं आहे. त्यामुळे त्याचा राग ते लोकांवर काढत आहेत, असं गोपाल तिरमारे (Gopal Tirmare) म्हणाले आहेत.