Pune | भगतसिंह कोश्यारी यांनी आळंदीत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं घेतलं दर्शन

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते महापूजा संपन्न झाली. यावेळी त्यांच्या हस्ते संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे बोधचिन्ह प्रकाशित केले. संत ज्ञानेश्वर महाराज 700 वर्षापूर्वी होऊन गेले असे वाटतच नाही. त्यांची शिकवण आजही उपयोगी पडत असल्याचं मत कोश्यारी यांनी माऊलींच्या दर्शनानंतर व्यक्त केले.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते महापूजा संपन्न झाली. यावेळी त्यांच्या हस्ते संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे बोधचिन्ह प्रकाशित केले. संत ज्ञानेश्वर महाराज 700 वर्षापूर्वी होऊन गेले असे वाटतच नाही. त्यांची शिकवण आजही उपयोगी पडत असल्याचं मत कोश्यारी यांनी माऊलींच्या दर्शनानंतर व्यक्त केले. दर्शनासाठी आलेल्या कोश्यारी यांनी यावेळी मंदिरात सुरू असलेल्या कीर्तनात सहभागी होऊन टाळ वाजवण्याचा आनंदही लुटला. आळंदीमध्ये कार्तिकी संजीवन समाधी सोहळा सुरू आहे. येत्या 2 तारखेला माऊलींचा संजीवन समाधी सोहळा पार पडणार आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI