Bhagat Singh Koshyari : राज्यपालांना डिस्चार्ज मिळाला! आज कोणता निर्णय घेणार राज्यपाल?
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (pravin darekar) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना एक पत्रं लिहिलं आहे. त्या पत्रावरही राज्यपाल काही निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नेमके कोणते निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. संध्याकाळपर्यंत राजभवनातून काही तरी निर्णय होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) हे कोरोनामुळे रुग्णालयात दाखल होते. चार दिवसानंतर त्यांनाही डिस्चार्ज मिळाला आहे. त्यामुळे राज्यपाल आता सक्रिय होणार आहेत. राज्याची राजकीय परिस्थितीचा राज्यपाल आढावा घेतील. त्यानंतर ते काही निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात गेल्या सहा दिवसांपासून राजकीय उलथापालथ सुरू आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्यासह 50 आमदारांनी बंड केल्याने राज्यात राजकीय अस्थिरतेचे ढग जमा झाले आहेत. या काळात त्यातच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (pravin darekar) यांनी त्यांना एक पत्रं लिहिलं आहे. त्या पत्रावरही राज्यपाल काही निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नेमके कोणते निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. संध्याकाळपर्यंत राजभवनातून काही तरी निर्णय होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
Published on: Jun 26, 2022 11:47 AM
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल

