‘केवळ विरोधी नेत्याच्या खुर्चीत बसल्यामुळं दादा असं बोलताय’; अजित पवार यांच्यावर कोणी केला पलटवार
अजित पवार हे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असताना आपण त्यांना भरती घेण्याबाबत विनंती केली होती. मात्र अडीच वर्षांमध्ये आपण परवानगी दिली नाही.
पाठण (सातारा) : राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी यांनी सातारा दौऱ्यात शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करताना, विकासावर बोला, नोकर भरतीवर बोला असं म्हटलं होतं. त्यावरून आता शिंदे गट विरूद्ध अजित पवार असा सामना रंगणार की काय असा प्रश्न पडत आहेत. कारण त्यांच्या त्या टीकेला आता साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पलवार केला आहे. तसेच अजित पवार हे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असताना आपण त्यांना भरती घेण्याबाबत विनंती केली होती. मात्र अडीच वर्षांमध्ये आपण परवानगी दिली नाही. पण आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फढणवीस आल्यापासून 75 हजार पद भरण्याचा पहिल्यांदा निर्णय झाला. त्याची प्रक्रिया सुरू झाली. शेतकऱ्यांना नुकसान भरपाईही दिली जात आहे. जी आपल्या काळात होत एनडीआरएफच्या निकशाच्या दुप्पट आहे. फक्त विरोधी पक्ष नेत्याच्या खुर्चीत बसल्याने तसचं तुम्ही बोलताय असा टोला लगावला आहे. काही लोकांना राज्याचा विकास झाला की नाही हे माहित आहे. फक्त सरकारवर टीका करण्यासाठी हे असं करायचं अशी टीका केली आहे.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक

