गुढीपाडव्यानिमित्त विठुरायाचं मंदिर सजलं; भाविकांची गर्दी
गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर झेंडु, आष्टर, ग्लेंडर, केशरी झेंडु, गुलाब, शेवंती, ड्रेसिना, औरकेड अशा विविध आकर्षक अशा फुलांची आरास ही मंदिरात करण्यात आली आहे
पंढरपूर : पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सण व उत्सवाला विविध प्रकारची आरास, विशेष सजावट करण्यात येते. यावेळीही गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर खास सजावट करण्यात आली. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा गाभारा, सोळखांबी, चारखांबि तसेच मंदिराच्या विविध भागाना फुलांनी जसवण्यात आले आहे.
यावेळी झेंडु, आष्टर, ग्लेंडर, केशरी झेंडु, गुलाब, शेवंती, ड्रेसिना, औरकेड अशा विविध आकर्षक अशा फुलांची आरास ही मंदिरात करण्यात आली आहे. हि आरास रांझंनगाव येथील विठ्ठल भक्त नानासाहेब पाचनकर यांनी केली. यासाठी जवळपास एक टन फुलांचा वापर करण्यात आला आहे. विविध रंगाच्या फुलांनी देवाचा गाभारा उजळून निघाला आहे. तर विठुरायाचे गोजिरे रूप पाहण्यासाठी भाविक मंदिरात दाखल होत आहेत.
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...

