AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ST संपावर तोडगा काढण्यात विलंब का? कोर्टाचा सरकारला सवाल

| Edited By: | Updated on: Mar 22, 2022 | 9:44 PM
Share

एसटी कर्मचाऱ्यांची वकील गुणरत्न सदावर्ते आणि सरकारी पक्ष यांच्यात आज न्यायलयात खडजंगी झालीय. आज कोर्टात नेमकं काय घडलं? याची माहिती गुणरत्न सदावर्ते यांनी दिली आहे.

मुंबई : गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ उलटून गेलाय. तरी एसटी कर्मचाऱ्यांचं (St Worker Strike) आंदोलन संपलेलं नाही. विलीकरणाचा मुद्दा अजूनही कोर्टात (High Court) असल्याने एसटी कर्मचारी पुन्हा आक्रमक झाले आहे. आज कोर्टात पुन्हा सुनावणी पार पडलीय. मात्र राज्य सरकारने विलीनीकरणाच्या मागणीवर विचार करायला वेळ मागितला आहे. त्यामुळे अजूनही हे घोंगड भिजत पडलं आहे. काही एसटी कर्मचाऱ्यांवर संपामुळे उपासमारीची वेळ आलीय. हजारो एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा (Action Against St Worker)बडगा उगारण्यात आलाय. त्यात दहा हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय कित्येक कामगारांना बडतर्फ आणि सेवासमाप्ती करण्यात आलीय. त्यामुळे एसटी कर्मचारी पुन्हा आक्रमक झाले आहे. त्यांनी आझाद मैदानात पुन्हा आंदोलनाची हाक दिलीय. एसटी कर्मचाऱ्यांची वकील गुणरत्न सदावर्ते आणि सरकारी पक्ष यांच्यात आज न्यायलयात खडजंगी झालीय. आज कोर्टात नेमकं काय घडलं? याची माहिती गुणरत्न सदावर्ते यांनी दिली आहे.