राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
उत्तराखंडमध्ये मल्लिकार्जुन खर्गे यांच्या कार्यक्रमानंतर झालेल्या शुद्धीकरण प्रकरणावरून राहुल गांधींवर गुन्हा दाखल झाला आहे. भाजपवर आरोप करत कारवाईची मागणी करणाऱ्या राहुल गांधींवर, धार्मिक विधीला जातीय रंग दिल्याचा आरोप ठेवत तक्रार दाखल झाली आहे. या प्रकरणी राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे.
उत्तराखंडमधील हलद्वानी येथे मल्लिकार्जुन खर्गे यांच्या कार्यक्रमानंतर झालेल्या कथित शुद्धीकरण प्रकरणावरून आता राहुल गांधींविरोधातच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरगे यांनी राज्यसभेत भाजपवर आपल्या कार्यक्रमानंतर स्टेजचे शुद्धीकरण केल्याचा आरोप केला होता. यानंतर राहुल गांधींनीही पत्रकार परिषद घेऊन भाजपने केलेल्या या कृतीला गुन्हा म्हटले होते आणि संबंधितांवर कारवाईची मागणी केली होती. मात्र, आता हलद्वानी येथील अमित कुमार नावाच्या एका व्यक्तीने राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आरोप केला आहे की, धार्मिक विधीचा कोणा व्यक्तीशी किंवा जातीशी संबंध नसताना, राहुल गांधींनी त्याला जातीय रंग दिला. या तक्रारीनंतर राहुल गांधींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे, विशेषतः काँग्रेस आणि भाजप यांच्यातील आरोप-प्रत्यारोप तीव्र झाले आहेत. भाजपने या शुद्धीकरण विधीमध्ये आपला कोणताही पदाधिकारी किंवा कार्यकर्ता सहभागी नसल्याचा दावा केला आहे.
