BJP Congress Alliance : शिंदेंचा गेम करण्यासाठी चक्क भाजपा-काँग्रेसची युती? हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच केलं, म्हणाले…
अंबरनाथ नगरपरिषदेत भाजपने काँग्रेस आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती केली आहे. शिंदेंच्या शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ही खेळी करण्यात आल्याचे बोलले जात आहे. शिंदेंच्या शिवसेनेने याला अभद्र युती म्हटले आहे. दुसरीकडे, हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपसोबत निवडणुकीत कुठलाही संबंध नसल्याचे स्पष्ट करत, स्थानिक नेत्यांकडून खुलासा मागितला आहे.
अंबरनाथ नगरपरिषदेतील स्थानिक राजकारणात मोठा बदल दिसून येत आहे. भारतीय जनता पक्षाने (भाजप) काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) साथीने युती करत सत्तेची समीकरणे बदलली आहेत. शिंदेंच्या शिवसेनेला नगरपरिषदेपासून दूर ठेवण्यासाठीच भाजपने ही खेळी केल्याचे बोलले जात आहे. नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचे सर्वाधिक २३ नगरसेवक निवडून आले होते. त्यापाठोपाठ भाजपचे १६, काँग्रेसचे १२ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ४ नगरसेवक होते. संख्याबळात शिंदेंच्या शिवसेनेला आघाडी असली तरी, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन बहुमताचा आकडा गाठला आहे.
भाजप आणि काँग्रेस एकत्र आल्याने अंबरनाथमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या युतीवर शिंदेंच्या शिवसेनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी याला अभद्र युती असे संबोधत टीका केली आहे. दुसरीकडे, काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी भारतीय जनता पार्टीशी निवडणूक लढताना कुठलाही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. चालू असलेली बातमी एकांगी असून, या संदर्भात स्थानिक तालुका अध्यक्ष आणि उमेदवारांकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे, असे सपकाळ यांनी नमूद केले.
तासाभरासाठीही हेलिकॉप्टर मिळेना... काँग्रेसच्या बड्या नेत्याची दमछाक
मुरळीधर मोहोळ राजकारणातून संन्यास घेणार? थेट विरोधकांना आव्हान
दोन्ही NCP एक होणार? ते सावरकरांबद्दल काय म्हणायचय? बघा दादांची मुलाखत
जलील यांच्या MIM पक्षाच्या रॅलीत कार्यकर्त्यांनाच मारहाण, घडलं काय?

