4 Minutes 24 Headlines : आज अर्थसंकल्प पटलावर येणार, घोषणांकडं शेतकऱ्यांसह जनतेचं लक्ष
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आजचा अर्थसंकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे
मुंबई : आज राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. शिंदे-फडणवीस सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प असणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थसंकल्प सादर करतील. त्यामुळे हे सरकार राज्यातील जनतेसाठी काय देणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आजचा अर्थसंकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज 17 वा वर्धापन दिन असल्याने ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. ठाण्याच्या पळी तलाव परिसरातही जय्यत तयारी करण्यात आली आहे. तर ठाण्यातील गडकरी रंगायतन येथून राज ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. येत्या निवडणूका लक्षात घेऊन मविआकडून सभांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिली सभा छ. संभाजीनगर येथे होणार आहे. यासह पहा इतर बातम्या 4 मिनिट 24 हेडलाईन्समध्ये
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

