नवाब मलिक यांना दिलासा की पुन्हा कोठडी; आज होणार फैसला?
मलिकांवर मागील काही दिवसांपासून कुर्ल्यात इस्पितळात उपचार होत आहेत. याआधीही मलिकांचा जामीन अर्ज न्यायालयाने नाकारला होता.
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोर्टाचा दिलासा मिळाला आणि ते घरी गेले. त्यामुळे मविआमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. मात्र अजूनही राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री नवाब मलिक यांना दिलासा मिळालेला नाही. त्यांना जामीन मिळालेला नाही.
राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जामीन अर्जावर आज मुंबईच्या सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. आज त्यांनी जामीन मंजूर होणार की पुन्हा कोठडीत रवानगी होणार कडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तर त्यांना ही माजी गृहमंत्री देशमुखांप्रमाणे दिलासा मिळेल का कडेही राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
मलिकांवर मागील काही दिवसांपासून कुर्ल्यात इस्पितळात उपचार होत आहेत. याआधीही मलिकांचा जामीन अर्ज न्यायालयाने नाकारला होता. मात्र आजच्या सुनावणीत त्यांना दिलासा मिळतो की, त्यांना पुन्हा कोठडी दिली जाते, याचा निर्णय होणार आहे.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

