VIDEO : Aurangabad | औरंगाबादमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, व्हि़डिओ व्हायरल

औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू आहे. याचा एक  व्हि़डिओ व्हायरल झाला आहे. औरंगाबादसह, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूरमधील धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत. काही ठिकाणी अतिवृष्टी होऊन पिकांचेही नुकसान झाले आहे.

औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू आहे. याचा एक  व्हि़डिओ व्हायरल झाला आहे. औरंगाबादसह, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूरमधील धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत. काही ठिकाणी अतिवृष्टी होऊन पिकांचेही नुकसान झाले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात रात्रीपासून मुसळधार पावसाने परिसराला झोडपले. बानोटी वरठाण घोसला परिसरातही पावसाचा हाहाकार पहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे. सुदैवाने यावेळच्या पावसात कुठलीही जीवित्त हानी झालेली नाही. बानोटी परिसरात नदीचे पाणी गावातील रस्त्यावर घुसले. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI