AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Helicopter Crash : सुनील तटकरे ‘त्या’ हेलिकॉप्टर मधूनच प्रवास करणार होते, पण…

Pune Helicopter Crash : सुनील तटकरे ‘त्या’ हेलिकॉप्टर मधूनच प्रवास करणार होते, पण…

| Updated on: Oct 02, 2024 | 10:41 AM
Share

पुण्यातील ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरुन उड्डाण घेतल्यानतंर अवघ्या तीन मिनिटातच या हेलिकॉप्टरला अपघात झाला. हे हेलिकॉप्टर डोंगराळ भागातून जात असल्याने तिथे मोठ्या प्रमाणावर धुके होते. या धुक्याचा अंदाज न आल्याने हे हेलिकॉप्टर कोसळले, असा अंदाज वर्तवला जात आहे

पुण्यातील बावधन परिसरात हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना घटली. पुण्यातील ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरुन आज सकाळी 7.30 वाजता या हेलिकॉप्टरने उड्डाण घेतले. उड्डाण घेतल्यानतंर अवघ्या तीन मिनिटातच या हेलिकॉप्टरला अपघात झाला. हे हेलिकॉप्टर डोंगराळ भागातून जात असल्याने तिथे मोठ्या प्रमाणावर धुके होते. या धुक्याचा अंदाज न आल्याने हे हेलिकॉप्टर कोसळल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. पुण्यात ज्या हेलिकॉप्टरला अपघात झाला, त्याच हेलिकॉप्टरने खासदार सुनील तटकरे याच हेलिकॉप्टरने प्रवास करणार होते, अशी मोठी माहिती देखील या हेलिकॉप्टरच्या दुर्घटनेनंतर समोर येत आहे. आज सकाळी सुनील तटकरे यांना नेण्यासाठी पुण्याहून मुंबईच्या दिशेने हे हेलिकॉप्टर रवाना झाले होते. मात्र त्यापूर्वीच या हेलिकॉप्टरला अपघात झाला. सुनील तटकरे हे याच हेलिकॉप्टरने रायगड जिल्ह्यातील सुतारवाडी येथे जाणार होते. त्यासाठी या हेलिकॉप्टरचे ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरुन उड्डाण झाले होते. सकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास या हेलिकॉप्टरने उड्डाण घेतले होते. मात्र, त्यानंतर काही वेळातच हेलिकॉप्टर बावधन बुद्रुक परिसरात ते कोसळले.

Published on: Oct 02, 2024 10:41 AM