हेमंत पाटलांसाठी कहीं खुशी..कहीं गम, भावना गवळींसह पत्ता कट; यवतमाळ-वाशिममध्ये कोणाला तिकीट?

हेमंत पाटलांसाठी कहीं खुशी..कहीं गम, भावना गवळींसह पत्ता कट; यवतमाळ-वाशिममध्ये कोणाला तिकीट?

| Updated on: Apr 04, 2024 | 10:29 AM

हेमंत पाटील यांची उमेदवारी शिंदे गटाने रद्द केली. तर यवतमाळ-वाशिममध्ये भावना गवळी यांचा पत्ता शिंदे गटाने कट केला. भावना गवळी ऐवजी हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटलांना तिकीट देण्यात आलंय. शिंदे गटाने हेमंत पाटील यांची जाहीर उमेदवारी रद्द केली तर....

हेमंत पाटील यांच्या उमेदवारीवरून भाजपने आक्षेप घेतला होता. त्यामुळे हिंगोलीतील जाहीर केलेला उमेदवार बदलण्याची नामुष्की शिंदे गटावर ओढावली आहे. हेमंत पाटील यांची उमेदवारी शिंदे गटाने रद्द केली. तर यवतमाळ-वाशिममध्ये भावना गवळी यांचा पत्ता शिंदे गटाने कट केला. भावना गवळी ऐवजी हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटलांना तिकीट देण्यात आलंय. शिंदे गटाने हेमंत पाटील यांची जाहीर उमेदवारी रद्द केली तर त्यांच्याऐवजी बाबुराव कदम कोहळीकर यांना तिकीट देण्यात आलंय. गेल्या ८ दिवसांपासूनचा सुरू असलेला सस्पेन्स संपला असून हेमंत पाटलांची उमेदवारी रद्द करून नवा उमेदवार आता लोकसभा लढणार आहे. यवतमाळ-वाशिममध्ये भावना गवळी यांचा पत्ता कट करून हेमंत पाटलांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आलीय. काल रात्री हेमंत पाटील २०० ते ३०० कार्यकर्ते घेऊन मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल होत जोरदार घोषणाबाजी केली. नेमकं काय घडलं….बघा स्पेशल रिपोर्ट…

Published on: Apr 04, 2024 10:29 AM