पुण्यात पुन्हा ‘हिट एण्ड रन’,रात्री दोघा बिट मार्शलना धडक, एकाचा मृत्यू

पुण्यातील पोर्शे 'हिट एण्ट रन' प्रकरणानंतर अशा प्रकारे अपघात केल्यानंतर वैद्यकीय मदतीसाठी न थांबता उलट पादचाऱ्यांना किंवा दुचाकीस्वारांना आणखी जखमी करुन पळून जाण्याचा सिलसिला सुरुच आहे. पोर्शे कार प्रकरणापाठोपाठ वरळीत एंटिलिया मॉलजवळ मोटर सायकलीवरुन जाणाऱ्या एका दाम्पत्याला ठोकरुन त्यातील महिलेला कारच्या बोनेटवरुन घसपटत दोन किलोमीटरपर्यंत नेत तिला गंभीर जखमी करण्याचा प्रकार शिंदे गटाचे नेते राजेश शाह यांचा मुलगा मिहीर शाह यांनी केला. यात महिलेचा मृत्यू झाला आहे.

पुण्यात पुन्हा 'हिट एण्ड रन',रात्री दोघा बिट मार्शलना धडक, एकाचा मृत्यू
| Updated on: Jul 08, 2024 | 1:01 PM

पुण्यात पोर्शे ‘हिट एण्ट रन’ प्रकरणानंतर पुन्हा एक ‘हिट एण्ड रन’चे प्रकरण घडले आहे. पुण्यात मध्यरात्री खडकी परिसरात रात्रीची गस्त घालत असणाऱ्या दोघा बिट मार्शलना धडक मारु वाहनचालक घटनास्थळावरुन फरार झाला आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या दोघा पोलिस शिपायांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. पुण्यात काही दिवसांपूर्वी धनाढ्य सुपूत्राने आपल्या अत्यंत महागड्या आणि नंबरप्लेट नसलेल्या पोर्शे कारने बाईकवरुन प्रवास करणाऱ्या एका तरुण आणि तरुणीला धडक मारुन त्यांना गंभीर जखमी केले होते. त्यात या दोघांचाही जागीच मृत्यू झाला होता. हा आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला 300 शब्दांचा निबंध लिहीण्याची शिक्षा बाल न्यायालयाने दिल्याने खूप टिका झाली होती. हायकोर्टाने देखील त्याला 300 शब्दांचा निबंध लिहीण्याची शिक्षा दिली आहे. पुण्यात काल मध्यरात्री घडलेल्या घटनेत जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर असलेल्या हॅरिस ब्रीजखाली दोन बिट मार्शल पोलीस रात्रीची गस्त घालण्यासाठी गेले होते. खडकी पोलिस ठाण्यात बीट मार्शल म्हणून काम करणारे या दोन पोलीस शिपायांच्या मोटारसायकलला समोरुन आलेल्या एका वेगवान चारचाकी गाडीने त्यांना धडक दिली.त्यत एका बिट मार्शलचा मृत्यू झाला आहे. समाधान कोळी या पोलीस शिपायाचा मृत्यू झाला आहे. तर कॉनस्टेबल शिंदे हे गंभीर जखमी झाले आहेत.जखमी शिंदे यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Follow us
'गुलाबी जॅकेट' वरून प्रश्न विचारताच दादा भडकले, तुला का त्रास होतोय..
'गुलाबी जॅकेट' वरून प्रश्न विचारताच दादा भडकले, तुला का त्रास होतोय...
नागपुरात तुफान पावसाची बॅटिंग, कोणत्या जिल्ह्याला पाऊस झोडपणार?
नागपुरात तुफान पावसाची बॅटिंग, कोणत्या जिल्ह्याला पाऊस झोडपणार?.
रत्नागिरीत तुफान पाऊस, 'जगबुडी'चं पाणी रस्त्यावर, गावांचा संपर्क तुटला
रत्नागिरीत तुफान पाऊस, 'जगबुडी'चं पाणी रस्त्यावर, गावांचा संपर्क तुटला.
भिवंडीला पावसानं झोडपलं, हा रस्ता की नदी..., ‘या’ भागात गुडघाभर पाणी
भिवंडीला पावसानं झोडपलं, हा रस्ता की नदी..., ‘या’ भागात गुडघाभर पाणी.
लाडकी बहीण-भाऊ योजनेनंतर आता 'लाडकी मेव्हणी'ची तयारी..जरांगेंकडून टीका
लाडकी बहीण-भाऊ योजनेनंतर आता 'लाडकी मेव्हणी'ची तयारी..जरांगेंकडून टीका.
मुंबईत समुद्र खवळला... उंच लाटा, पाऊस वाढला तर मुंबईची होणार तुंबई
मुंबईत समुद्र खवळला... उंच लाटा, पाऊस वाढला तर मुंबईची होणार तुंबई.
कोकणातील चाकरमान्यांची गैरसोय नको म्हणून 'मरे'चा निर्णय, उद्यापासून...
कोकणातील चाकरमान्यांची गैरसोय नको म्हणून 'मरे'चा निर्णय, उद्यापासून....
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर दादांचं गुलाबी कॅम्पेन? विरोधकांची हल्लाबोल
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर दादांचं गुलाबी कॅम्पेन? विरोधकांची हल्लाबोल.
भाजप कोअर बैठकीत अजितदादा अन् शिंदेंवर नाराजी? मदत न केल्याचा सूर?
भाजप कोअर बैठकीत अजितदादा अन् शिंदेंवर नाराजी? मदत न केल्याचा सूर?.
कलेक्टरिन बाईंचं पद धोक्यात? पूजा खेडकर यांना UPSC ची थेट नोटीस
कलेक्टरिन बाईंचं पद धोक्यात? पूजा खेडकर यांना UPSC ची थेट नोटीस.