Navneet Rana | MRI सुरु असताना फोटो कसे? लिलावती रुग्णालयाविरोधात शिवसेनेची तक्रार, नवनीत राणा MRI प्रकरण भोवणार

वनीत राणा यांचा MRI सुरु असताना फोटो कसे काढले गेले, हा मुख्य आक्षेप शिवसेनेने घेतला आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शुभम कुलकर्णी

May 10, 2022 | 12:15 PM

मुंबईः नवनीत राणा यांच्या MRI वरून शिवसेनेनं आज लिलावती रुग्णालयाविरोधात (Lilavati hospital) पोलिसात तक्रार दाखल केली. शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्या नेतृत्वात शिवसेनेचं शिष्टमंडळ आज पोलीस ठाण्यात पोहोचलं. नवनीत राणा (Navneet Rana) यांचा MRI सुरु असताना फोटो कसे काढले गेले, हा मुख्य आक्षेप शिवसेनेने घेतला आहे. MRI सारख्या कक्षात रुग्णाच्या नातेवाईकांना किंवा कुणालाही मोबाइल किंवा इतर धातूच्या वस्तूच्या घेऊन जाण्याची परवानगी नसते. मग नवनीत राणा यांचे फोटोसेशन झालेच कसे? असा प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केला. सेनेने आज बांद्रा पश्चिम पोलीस ठाण्यात लीलावती रुग्णालय प्रशासन विरोधात लेखी तक्रार दाखल केली. सेनेच्या विधान परिषद सदस्य प्रा डॉ मनीषा कायंदे, माजी महापौर किशोरी पेडणेकर, माजी नगरसेवक अनिल कोकीळ आणि युवा सेनेचे राहुल कणाल यांनी मंगळवारी लीलावती रुग्णालयात धडक देवून प्रशासनाला धारेवर धरले होते. आज या चौघांनी सकाळी बांद्रा पोलीस स्टेशन गाठून रुग्णालय विरोधात तक्रार दाखल केली.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें