Imtiyaz Jaleel | हिंमत असेल तर औरंगाबादचं नाव बदलून दाखवाच, खासदार इम्तियाज जलील यांचं आव्हान
राज्य शासनाच्या एका परिपत्रकात औरंगाबाद शहराचा उल्लेख औरंगाबाद ऐवजी संभाजीनगर असा करण्यात आलाय. या उल्लेखानंतर एमआयएम पक्षाचे नेते तथा औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील चांगलेच भडकले आहेत. त्यांनी हिंमत असेल तर शहराचे नाव बदलून दाखवा असं थेट आव्हान दिलं आहे.
राज्य शासनाच्या एका परिपत्रकात औरंगाबाद शहराचा उल्लेख औरंगाबाद ऐवजी संभाजीनगर असा करण्यात आलाय. या उल्लेखानंतर एमआयएम पक्षाचे नेते तथा औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील चांगलेच भडकले आहेत. त्यांनी हिंमत असेल तर शहराचे नाव बदलून दाखवा असं थेट आव्हान दिलं आहे. तसेच ज्या अधिकाऱ्यांनी हे परिपत्रक काढलं त्याने राजीनामा द्यावा अशी मागणी जलील यांनी केली आहे. या प्रकारामुळे औरंगाबादेतील वातावरण तापण्याची शक्यता आहे.
औरंगाबाद शहराच्या नावावरुन मागील कित्येक वर्षांपासून मोठा वाद आहे. शिवसेना तसेच भाजपसारखे हिंदुत्ववादी पक्ष औरंगाबाद शहराचा संभाजीनगर असा उल्लेख करतात. तर काँग्रेससारख्या पक्षाने औरंगाबाद शहराचे नाव बदलण्याला विरोध केलेला आहे. फक्त शहराचे नाव बदलण्यापेक्षा पायाभूत सुविधांचा विकास व्हावा अशी भूमिका काँग्रेससारख्या पक्षांनी घेतलेली आहे. या पार्श्वभूमीवर आता एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. एका सरकारी परिपत्रकात औरंगाबाद शहराचा उल्लेख थेट संभाजीनगर अस करण्यात आलाय. मात्र हा प्रकार उघडकीस आल्यानंतर औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी आक्रमक पवित्रा धरण केला आहे. जलील यांनी हिंमत असेल तर शहराचं नाव बदलून दाखवा, असं म्हणत थेट आव्हान दिलं आहे. तसेच ज्या अधिकाऱ्यांनी हे परिपत्रक काढलं त्याने राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीदेखील इम्तियाज जलील यांनी केली आहे.
Published on: Oct 23, 2021 04:23 PM
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..

