Imtiaz Jaleel : जालन्यातून कार्यकर्ते का आणताय, इथे नाही का? इम्तियाज जलील यांची शिरसाटांवर खरपूस टीका
Imtiaz Jaleel Vs Sanjay Shirsat : मंत्री संजय शिरसाट आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यातला वाद आता टोकाला गेलेला बघायला मिळत आहे.
छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्या घरावर चिखल फेकण्याचा इशारा शिंदेसेनेचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांच्या समर्थकांनी दिल्यानंतर आता जलील यांच्या घराबाहेर तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. इम्तियाज जलील यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर शिरसाट यांच्या समर्थकांनी हा इशारा दिला आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणी आता इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय शिरसाट यांनी एमआयडीसीच्या जागेबाबत बोलावं, माझ्याकडे अनेक पुरावे आहेत, ते पुरावे मी तुम्हाला देईल, असं जलील यांनी म्हंटलं आहे. जालन्यातून इथे माझ्या घरावर चिखल फेकायला का येत आहे? इथे संभाजीनगरमध्ये त्यांचे समर्थक नाही का? इथे सगळ्यांना समजल आहे की, जलील काहीही खोटं बोलत नाही आहे. त्यामुळे आता त्यांना जालन्यात पैसे देऊन इथे माझ्या घरावर चिखल फेकायला कार्यकर्ते आणावे लागत आहे, अशी खरमरीत टीका देखील यावेळी जलील यांनी केली आहे.
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...

