आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल यांच्या घरावर धाड
शिवसेना उपनेते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव (yashwant jadhav) यांच्या घरावर आयकर विभागाने धाड मारल्याची घटना ताजी असतानाच शिवसेनेच्या (shivsena) आणखी एका नेत्याच्या घरी छापेमारी सुरू आहे
मुंबई: शिवसेना उपनेते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव (yashwant jadhav) यांच्या घरावर आयकर विभागाने धाड मारल्याची घटना ताजी असतानाच शिवसेनेच्या (shivsena) आणखी एका नेत्याच्या घरी छापेमारी सुरू आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि युवासेनेचे पदाधिकारी राहुल कनाल (rahul kanal) यांच्या घरी आयकर विभागाने छापा मारला आहे. आज सकाळीच आयकर विभागाचे एक पथक कनाल यांच्या घरी पोहोचले आणि त्यांनी छापेमारीस सुरू केली. यावेळी केंद्रीय राखीव दलाच्या जवानांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे शिवसेना नेते संजय राऊत यांची आज दुपारी पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी तपास यंत्रणांचा भ्रष्टाचार उघड करणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यापूर्वीच शिवसेना नेत्याच्या घरी आयकर विभागाने धाड मारल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Published on: Mar 08, 2022 11:48 AM
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
