West Bengal Election Results | निर्णायक दिवस! 5 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल, प.बंगालमध्ये तृणमृलच जिंकेल, ममता बॅनर्जींचा दावा
देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला काही वेळात सुरुवात होणार असून, राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या राज्यांमध्ये झालेल्या मतदानानंतर आज निकाल स्पष्ट होणार आहेत. महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी येथील मतमोजणीही आज पार पडणार असून, निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला काही वेळात सुरुवात होणार असून, राजकीय वर्तुळात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या राज्यांमध्ये झालेल्या मतदानानंतर आज निकाल स्पष्ट होणार आहेत.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण 294 जागा असून, बहुमतासाठी 148 जागांची आवश्यकता आहे. तृणमूल काँग्रेसने 226 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा दावा केला असून, मागील 2021 च्या निवडणुकीत पक्षाने 215 जागांवर विजय मिळवला होता. तर तामिळनाडूमध्ये 234 जागांसाठी मतदान झाले असून, 118 जागांचा टप्पा गाठणारा पक्ष सत्तास्थापना करणार आहे. येथे मुख्य लढत डीएमके, अण्णा द्रमुख आणि इतर पक्षांमध्ये आहे. केरळमध्ये 140 जागांपैकी 71 जागा बहुमतासाठी आवश्यक आहेत. येथे एलडीएफ आणि यूडीएफ यांच्यात थेट सामना आहे. आसाममध्ये 126 जागांसाठी निवडणूक झाली असून, 64 जागांचा आकडा गाठणारा पक्ष सत्ता स्थापन करेल. येथे भाजप आणि काँग्रेस यांच्यात मुख्य लढत आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी येथील मतमोजणीही आज पार पडणार असून, निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प.बंगालमध्ये तृणमृलच जिंकेल, ममता बॅनर्जींचा दावा
5 राज्यांचा सुपरफास्ट निकाल पहा फक्त tv9marathi वर
स्वतःच्या मुलीवरही अत्याचार, नसरापूरमधील नराधमाला 20 वर्षांपूर्वीच...
60 फुट उंचवर रिल्स बनवणं भोवलं, 16 तास चालला रेस्क्युचा थरार, पुढे काय

