India Pakistan DGMO Meeting : भारत – पाकिस्तानच्या डिजीएमओची महत्वाची बैठक, काय होणार चर्चा?
युद्धबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर आता भारत पाकिस्तानच्या डिजीएमओची उद्या महत्वाची बैठक होणार आहे.
काल संध्याकाळच्या सुमारास भारत – पाकिस्तानमध्ये युद्धबंदीचा निर्णय जाहीर झाला आहे. त्यानंतर आता उद्या भारत आणि पाकिस्तानचे डिजीएमओ एकमेकांशी चर्चा करणार आहेत. दोन्हीकडून कोणत्या मुद्यांवर चर्चा होईल, दोन्ही देशांच्या भूमिका काय आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, सिंधु जल करार आणि पाकिस्तानसोबतचा व्यापार बंदच राहील, असं भारताकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. पाकिस्तानसोबत दहशतवादाशिवाय इतर कोणत्याही मुद्यावर चर्चा होणार नाही, अशी भारताची भूमिका आहे. दुसरीकडे सिंधु करार आणि काश्मीरच्या मुद्यावर नव्याने चर्चा होईल अशी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरिफ यांना अपेक्षा आहे. त्यामुळे या बैठकीत काय चर्चा होईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.