India Pakistan War : कंबरडेच मोडले… भारताचा मोठा स्ट्राईक, 5 एअरबेस बघता बघता उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?
भारताने पाकला जशाच तसं उत्तर देत पाकिस्तानची एअरबेसची काही ठिकाणं नष्ट केली आहेत. ती ठिकाणं पाकिस्तानसाठी का महत्त्वाची होती? जाणून घेऊया...
भारताने पाकचा डाव उधळून लावत पाकच्या रावळपिंडी, चकलाल, शेरकोट, रहीमयार एअरबेसवर स्फोट घडवून आणत ते पूर्णतः उद्ध्वस्त केले आहे. पाकिस्तानातील रावळपिंडी येथील नूरखान एअरबेस हा पाक वायुसेनेचा सर्वात प्रमुख एअरबेस होता. बेस उद्ध्वस्त झाल्याची पुष्टी पाकनेही केलीये. हल्ल्यावेळी इथं मोठ्या प्रमाणात लढाऊ विमानं असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. भारताकडून कऱण्यात आलेल्या स्फोटात रडार यंत्रणाही नेस्तनाबूत झाल्याचं सांगितलं जातंय. पाक सैन्याचं मुख्यालय देखील एअरबेसच्या बाजूला आहे.
तर पाकिस्तानचा पंजाब प्रांतातील रहिम यार खान एअर बेस या हल्ल्यात नष्ट झाला आहे. याच बेसमधून पाक सैन्य भारताच्या हद्दीत ड्रोन पाठवून हल्ले करत होतं. मात्र भारताच्या हल्यात येथील सगळे ड्रोन नष्ट झाल्याचा अंदाज आहे. भारताच्या राजस्थान आणि गुजरात सीमेजवळ असल्याचे हा एअरबेस पाकसाठी महत्त्वाचा होता. चकलाला येथील मुरीद एअरबेसचंही हल्ल्यात मोठं नुकसान झालं आहे. हा एअरबेस देखील रावळपिडींपासून काही अंतरावर होता. पाकिस्तान वायुदलाच्या युद्ध सामुग्रीसाठी हा तळ महत्त्वाचा होता. आणखी नेमके कोणते-कोणते एअरबेस पाकमध्ये होते? जे भारतानं उडवलेत… बघा व्हिडीओ
Published on: May 10, 2025 01:38 PM
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
