India Pakistan Conflict Update : संयुक्त राष्ट्रसंघात भारत पाकिस्तानची कोंडी करणार; काय म्हणाले विक्रम मिसरी?
MPs to visit global capitals with anti-terror message : संयुक्त राष्ट्रातील 15 सदस्य देशात खासदारांचं शिष्टमंडळ पाठवून भारताकडून पाकिस्तानची संयुक्त राष्ट्रसंघात कोंडी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
संयुक्त राष्ट्रसंघात भारत पाकिस्तानची कोंडी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. संयुक्त राष्ट्रातील 15 सदस्य देशात खासदारांचं शिष्टमंडळ जाणार आहे. भारताने नागरिकांना नव्हे तर दहशतवादी आणि लष्करी तळांना लक्ष्य केलं, असं विक्रम मिसरी म्हणाले आहेत.
संयुक्त राष्ट्रसंघातच्या 15 सदस्य देशांमध्ये खासदारांचं शिष्टमंडळ जाणार आहे. भारताने नागरिकांना नव्हे तर दहशतवादी आणि लष्करी तळांवर लक्ष्य केल असल्याचं मिसरी यांनी सांगितलं आहे. खासदारांच्या शिष्टमंडळाला पाकिस्तानचे दहशतवाद्यांशी असलेले संबंधाचे कागदपत्र देणार आहेत. इतर देशातील सरकारमधील महत्वाच्या नेत्यांशी, अधिकाऱ्यांशी आणि मिडियाशी चर्चा करताना दूतावासातील उपस्थित असतील. पाकिस्तानच्या डिजीएमओंच्या फोननंतर आता युद्धविराम झाला असल्याचं देखील मिसरी म्हणाले आहेत. त्यामुळे आता भारताकडून पाकिस्तानची संयुक्त राष्ट्रसंघात कोंडी केली जाणार आहे.