India vs Pakistan War : पाकिस्तानचं पितळ उघडं, गेले हल्ला करायला अन् मिसाईल फुटलंच नाही; फुसका बार पाहण्यासाठी गर्दी
पाकिस्तानचं फुसकं मिसाईल बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. यावेळी नागरिकांनी या बोगस मिसाईलचे फोटो व्हिडीओ काढले. यानंतर नागरिकांनी पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. तर पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर या अवशेषांची तपासणी केली जाणार आहे.
पाकिस्तान सातत्याने भारतावर काही ना काही कुरघोड्या करताना दिसतोय. पाकिस्तानकडून भारतावर हल्ले करण्याची खुमखुमी असल्याचे दिसतेय. मात्र पाकिस्तानचा कोणताच डाव भारतीय लष्कर यशस्वी होत देत नाही. काल देखील पाकिस्तानकडून भारतातील जम्मू काश्मीर, राजस्थान आणि पंजाब या ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र भारताने हा डाव चांगलाच उधळून लावल्याची माहिती मिळतेय. अशातच पुन्हा एकदा पाकिस्तानचं पितळ उघडं पडलं आहे. कारण पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेलं मिसाईल फुसका बार निघाल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानकडून भारतावर डागण्यात आलेलं मिसाईल फुटलंच नाही. याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. पाकिस्तानचा जैसरमेल येथे हल्ला करण्याचा डाव होता. यासाठी पाकिस्तानकडून जैसरमेल येथे मिसाईल हल्ला करण्यात आला मात्र पाकचा डाव उधळला असून हे मिसाईल न फुटता असंच एका मोकळ्या जागेत पडल्याचे पाहायला मिळतंय. यानंतर जैसरमेल येथील नागरिकांनी हे फुसकं आणि बोगस मिसाईल बघण्यासाठी त्या मिसाईल भोवती एकच गर्दी केली.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको

