India-Pakistan Conflict : … हे लक्षात ठेवावं, पाकला मदत करणाऱ्या तुर्की अन् चीनला भारताचा इशारा
भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अलीकडेच अफगाणिस्तानच्या कार्यवाहक परराष्ट्रमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, संभाषणादरम्यान, परराष्ट्रमंत्र्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केल्याबद्दल अफगाणिस्तानच्या मंत्र्यांचे आभार मानले.
पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्की आणि चीनला भारताने इशारा दिला आहे. तुर्कीने पाकिस्तानमध्ये फोफावणाऱ्या दहशतवादाविरोधात भूमिका घ्यावी, असे म्हणत भारताने चांगलंच खडसावल्याचे पाहायला मिळाले. द्विपक्षीय संबंधासाठी संवेदनशीलता महत्त्वाची आहे. तर परस्परातील संबंध हे सहनशीलतेवर अवलंबून असतात हे चीनला माहिती आहे, हे तुर्कीने लक्षात ठेवावं, असा इशाराच भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिलाय. तर तुर्कीबाबत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने असेही म्हटले की, “आम्हाला अपेक्षा करतो की तुर्की पाकिस्तानला आवाहन करेल की, सीमापार दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवावे आणि दशकांपासून आश्रय दिलेल्या दहशतवादी पायाभूत सुविधांविरुद्ध विश्वासार्ह आणि ठोस पावले उचलावीत. तर द्विपक्षीय संबंध एकमेकांच्या चिंतांबद्दल संवेदनशीलतेवर बांधले जातात, असेही भारताकडून सांगण्यात आले.