Pakistan : भारत-पाकमध्ये जर अणुयुद्ध झालं तर… पाक आर्मीचा लेफ्टनंट जनरल अहमद शरीफची तंतरली, युद्धाच्या कल्पनेनं घाबरगुंडी
पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्याने असे म्हटले की, पाकिस्तानी लोक विजय साजरा करत नाहीत तर शांतीचा उत्सव साजरा करत आहेत. आम्ही प्रामाणिक लोक आहोत आणि आम्ही अल्लाहचे आभार मानतो. छाती ठोकण्याऐवजी, आपण शांतीप्रिय लोक असल्याने नम्रपणे आपले डोके टेकवत आहोत.
भारत-पाकमध्ये अणूयुद्ध झाल्यास तो मूर्खपणा असेल, असं वक्तव्य पाकिस्तानी आर्मीचा लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ याने केलंय. भारतासोबतच्या युद्धाच्या कल्पनेनं पाकिस्तान चांगलाच घाबरल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे चीनच्या सरकारी वाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत, पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) चे महासंचालक लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी असं म्हटलं की, पाकिस्तान आणि चीन दहशतवादाविरुद्ध एकत्र लढत आहेत. आम्ही इतर देशांच्या मदतीने त्याविरुद्ध लढत आहोत. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश असूनही, चीनने ज्या पद्धतीने प्रगती केली आहे ती सर्व देशांनी पाहिली पाहिजे. पाकिस्तानच्या लोकांनाही प्रगती आणि शांती हवी आहे. आम्हाला विकास आणि स्थिरतेकडेही वाटचाल करायची आहे. आम्ही पाकिस्तानच्या लोकांचे आणि आमच्या भावी पिढ्यांचे ऋणी आहोत. म्हणूनच आमची प्राथमिकता नेहमीच शांतता असते, असं म्हणत चोराच्या उलट्या बोंबा पाहयला मिळाले.

..अन् दुर्घटनेचा LIVE व्हिडिओ बनला, शूट करणाऱ्याच्या मित्रानं सांगितलं

इस्त्रायल-इराण संघर्ष पेटला, जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर?

बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन स्थगित; जर सरकारनं विश्वास घात केला तर..

सामंत ठरले सरकारचे नवे संकटमोचक, पत्र देताच बच्चू कडूंचा मोठा निर्णय
