Operation Sindoor : हेच ते बंकर जे जमिनीपासून 15 फूट खोल, जिथून भारतीय सैन्य शत्रूच्या हालचालीवर ठेवते नजर
भारताने पाकिस्तानचे हल्ले कसे हाणून पाडले? एलओसीवरून बघा LOC वरील भारतीय सैन्याची शौर्यगाथा... टीव्ही ९ चा ग्राऊंड रिपोर्टच्या माध्यमातून
LOC पासून काही अंतरापासून दूर भारतीय सैन्याने बंकर बांधले आहेत. जमिनीपासून १५ फूट खोल भारतीय सैन्याचे हे बंकर असल्याची माहिती मिळतेय. याच सैन्याच्या बंकरमधून टीव्ही ९ चा ग्राऊंड रिपोर्ट… भारतीय सैन्याचे हेच ते बंकर आहे जिथून भारतीय सैन्य शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर बारीक नजर ठेवते. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी, भारताने ७ मे च्या रात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले, ज्या अंतर्गत सैन्याने नियंत्रण रेषेवरील दहशतवाद्यांचे अड्डे आणि पाकिस्तानी चौक्या उद्ध्वस्त केल्या. भारतीय सैन्याने पाकिस्तानचे ६००-७०० ड्रोन हल्लेही उधळून लावले आणि प्रत्युत्तरात अनेक पाकिस्तानी सैनिकही मारले गेल्याची माहिती समोर आली आहे..
Published on: May 21, 2025 12:43 PM
Latest Videos
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट

