Pak Terrorism : कट्टर शत्रू अन् मोस्ट वाँटेड दहशवादी भारताला हवेत, या दहशतवाद्यांची यादी पाकला पाठवणार अन्…
पाकिस्तानने विश्वसनीयता सिद्ध करण्यासाठी दहशतवाद्यांचे प्रत्यार्पण करावे, असा आग्रह भारत करण्याची शक्यता आहे. भारतीय एजन्सी इंटकपोलद्वारे रेड कॉर्नर नोटीसचा पाठपुरावा केला जात आहे.
भारताला हव्या असणाऱ्या दहशतवाद्यांची यादी पाकिस्तानला पाठवणार असल्याची माहिती समोर येत आहे. मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांचा या यादीत समावेश असून ही यादी पाकिस्तानला पाठवण्यात येणार आहे. या यादीमध्ये भारताचे कट्टर दुश्मन हाफिज सईद, दाऊद आणि मसूद अजहर यांची नावं असून हे दहशतवादी भारताला हवेत, अशी यादी भारताकडून पाकिस्तानला सोपवली जाणार आहे. दहशतवादी द्या आणि विश्वसनीयता सिद्ध करा, असा प्रस्ताव भारताकडून पाकिस्तानला देण्यात आला आहे. दरम्यान, पाकिस्तानात हाफिज सईद, दाऊद आणि मसूद अजहर मोकाट फिरतायत. मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांची यादी पाठवून त्यांना भारताच्या ताब्यात देण्याची मागणी भारत पाककडे करणार आहे. हाफिज सईद हा 26/11 चा मुख्य सूत्रधार तर दाऊद हा 1993 च्या मुंबई ब्लास्टसाठी भारताला हवा आहे. यासह मसूद अजहर जैशचा प्रमुख असून पुलवामा आणि इतर हल्ल्याशी संबंधित आहे.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?

