मुंबई-शिर्डी, मुंबई- सोलापूर वंदे भारत सुसाट
देशाबरोबरच राज्यातही सुरू असणाऱ्या 'वंदे भारत'ला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्यात मुंबई-शिर्डी, मुंबई- सोलापूर या वंदे भारत एक्स्प्रेसला मोठा प्रतिसाद मिळत आहे
मुंबई : भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठी प्रवासी यंत्रणा असून आता यात स्वदेशी बनावटीच्या ‘वंदे भारत’ चा ही समावेश झाला आहे. सध्या देशात ‘वंदे भारत’ ला चांगलीच पंसती मिळत असल्याचे समोर येत आहे. देशाबरोबरच राज्यातही सुरू असणाऱ्या ‘वंदे भारत’ला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्यात मुंबई-शिर्डी, मुंबई- सोलापूर या वंदे भारत एक्स्प्रेसला मोठा प्रतिसाद मिळत असून यामुळे महिनाभरात दोन्ही मार्गावर रेल्वेला जवळपास आठ लाखांचा महसूल प्राप्त झाला आहे. मुंबई शिर्डी मार्गावर तब्बल 46 हजार 71 प्रवाशांनी प्रवास केला आहे. तर मुंबई-सोलापूर मार्गावर गेल्या महिनाभरात आतापर्यंत 53,548 प्रवाशांनी प्रवास केलाय.
Published on: Mar 26, 2023 08:41 AM
Latest Videos
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

