Yoga Day 2025 : संपूर्ण देश योगात मग्न; थेट विशाखापट्टणमहून पंतप्रधान मोदींचा खास संदेश, म्हणाले…तर कोणीच थांबवू शकत नाही
योग म्हणजे केवळ शारीरिक व्यायाम नाही तर योग म्हणजे तंदुरुस्ती, नियमित योगा केल्याने आत्म-जागरूकता, मानसिक स्पष्टता, भावनिक संतुलन आणि आध्यात्मिक विकासाचा प्रवास आहे, असं मोदी म्हणाले.
आज २१ जून रोजी भारत आणि जगभरात ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यावेळी योग दिन “एक पृथ्वी अन् आरोग्यासाठी योग” या थीमसह जगभरात साजरा केला जात आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी त्यांनी देशवासियांनी योगाचे आणि योग दिनाचे महत्त्व पटवून सांगितले. तसेच ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा देखील दिल्यात.
विशाखापट्टणम येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या खूप शुभेच्छा. आज, ११ व्या वेळी, संपूर्ण जग २१ जून रोजी एकत्र योगा करत आहे. योगाचा अर्थ फक्त जोडणे आहे. योगाने संपूर्ण जगाला कसे जोडले आहे हे पाहणे आनंददायी आहे. जगभरात अशांतता वाढल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी योगाची सर्वात जास्त गरज आहे. योगातून शांती मिळते. योग तणावातून समाधानाकडे घेऊन जातो. योगाला एक जनआंदोलन बनवू या. हे आंदोलन जगाला शांती, आरोग्य आणि समरसताकडे घेऊन जाईल. योग नियमित केला तर मानसिक समाधान मिळण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही”

भारतीय नर्स निमिषा प्रियाला दिलासा, येमेनमधील उद्याची फाशी टळली

मुंबईत मुसळधार, अंधेरी सबवे पाण्याखाली; वाहतूक कोंडी

अरे आमची लाज काढू नका... भर सभागृहात शंभूराज देसाई संतापले अन्...

तुमच्यापेक्षा जास्त बोलता येत; सरकारची लाज काढली, गुलाबराव पाटील भडकले
