VIDEO : Pankaja Munde | आरक्षणाशिवाय निवडणुका घेणं धक्कादायक, भाजप नेत्या पंकजा मुंडे

पंकजा मुंडे म्हणाल्या आहे की, या निर्णयाविरोधात आम्ही न्यायालयात धाव घेणार आहोत. कारण ओबीसी समाजाच्या राजकिय अस्तित्वाचा हा प्रश्न आहे. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम व नागपूर या ५ जिल्हा परिषदा तसेच त्यांतर्गतच्या ३३ पंचायत समित्यांमधील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. 

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jun 23, 2021 | 2:18 PM

राज्यात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा (OBC Political Reservation) विषय अत्यंत संवेदनशील होत असताना राज्य निवडणूक आयोगाकडून धुळे, नंदुरबार सह पाच जिल्हा परिषद आणि ३३ पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणं हा तर ओबीसींवर अन्याय आहे, असे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आज म्हटलं आहे. पत्रकारांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या आहे की, या निर्णयाविरोधात आम्ही न्यायालयात धाव घेणार आहोत. कारण ओबीसी समाजाच्या राजकिय अस्तित्वाचा हा प्रश्न आहे. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम व नागपूर या ५ जिल्हा परिषदा तसेच त्यांतर्गतच्या ३३ पंचायत समित्यांमधील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें