Kalpita Pimple | अनधिकृत बांधकामांवरील कारवाई थांबावी यासाठी हा हल्ला : कल्पिता पिंपळे
डिस्चार्ज मिळाल्यानंतर पिंपळे यांनी आपल्यावरील हल्ला हा अनधिकृत बांधकामांवरील कारवाईमुळे झाल्याचा खळबळजनक दावा केलाय. फेरिवाल्यांवरील कारवाई हे एक कारण असल्याचं त्यांनी म्हटलंय.
ठाणे : महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. कल्पिता पिंपळे यांच्यावर 30 ऑगस्ट रोजी हल्ला करण्यात आला होता. ठाण्यातील फेरिवाल्यांवर कारवाई सुरु असताना कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्यांची दोन बोटं तुटली. तर त्यांच्या अंगरक्षकही या हल्ल्यात जखमी झाला असून त्याचं एक बोट तुटलं आहे. पिंपळे यांच्यावर मागील 8 दिवसांपासून ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यानंतर आज पिंपळे यांना डिस्चार्ज मिळाला आहे. दरम्यान, डिस्चार्ज मिळाल्यानंतर पिंपळे यांनी आपल्यावरील हल्ला हा अनधिकृत बांधकामांवरील कारवाईमुळे झाल्याचा खळबळजनक दावा केलाय. फेरिवाल्यांवरील कारवाई हे एक कारण असल्याचं त्यांनी म्हटलंय.
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
