Karnataka Election Result : तुम्ही पप्पू म्हटलं, तो तर तुमचा..; सुषमा अंधारेंची खोचक टीका, फडणवीस यांच्यावरही निशाना
सुषमा अंधारे यांनी 'पप्पू पास नही हो गया, पप्पू मेरिट मे आ गया' असं म्हणत भाजपवर चांगलीचं टीका केली आहे. तर 'मोदी है तो मुनकीन है' असे म्हणनाऱ्या लोकांना कर्नाटकचा हा निकाल भक्तजनांसाठी चपराक आहे.
मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या 2023च्या सर्व 224 जागांचे कल हाती आले आहेत. सुरुवातीच्या कलांनुसार काँग्रेसने बहुमताचा आकडा गाठला आहे. तर, भाजप आणि जनता दलाला अपेक्षित अशी आघाडी मिळवता आलेली नाही. यावरून विरोधी पक्षांनी भाजपला घेरत टीका करणे सुरू केलं आहे. याच्या आधी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना ते जातील तेथे भाजप हारतं असं म्हटलं होते. त्यानंतर आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ‘पप्पू पास नही हो गया, पप्पू मेरिट मे आ गया’ असं म्हणत भाजपवर चांगलीचं टीका केली आहे. तर ‘मोदी है तो मुनकीन है’ असे म्हणनाऱ्या लोकांना कर्नाटकचा हा निकाल भक्तजनांसाठी चपराक आहे. तर ज्या राहुल गांधींना भाजपच्या स्लीपर सेल ने पप्पू म्हणून हिणवलं ते तर सर्वांचे बाप निघाले. तसेच यावेळी त्यांनी, फडणवीस यांना लक्ष्य करताना, फडणवीसांनी कर्नाटकात जाऊन धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, गरज नसताना बजरंगबलीचा मुद्दा फडणवीसांनी काढला. या सगळ्याचा तिथे अजिबात फायदा झाला नाही. त्यामुळे आता असे कार्ड ते महाराष्ट्रात वापरताना दहा वेळा विचार करतील, शब्दांत अंधारेंनी भाजपसह फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान

