महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सुरु असताना नवी कुरापत, सांगलीच्या जतमधील 40 गावांवर कर्नाटकचा दावा

बसवराज बोम्मई यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला सुरुवात झाली आहे.

सोनेश्वर भगवान पाटील, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Nov 23, 2022 | 12:41 PM

Basavaraj Bommai : महाराष्ट्र -कर्नाटक सीमावाद थांबायचं नावच घेत नाही. हा वाद सुरु असतानाच कर्नाटकचे (Karnataka) मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai )यांनी  सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 40 गावांवर दावा केला आहे. बोम्मई यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला सुरुवात झाली आहे.

बसवराज बोम्मई नेमकं काय म्हणाले?

सांगली जिल्ह्यातील जत तालुका दुष्काळग्रस्त असून त्या ठिकाणी पाणीटंचाई आहे. दुष्काळ असणाऱ्या गावांमध्ये आम्ही पाणी देऊन त्यांना मदत केली आहे. त्यामुळे जतमधील 40 गावांनी कर्नाटकात सामील होण्याचा ठराव केला आहे. त्यामुळे जतमधील गावकऱ्यांनी केलेल्या प्रस्तावावर आम्ही गांर्भीयानं विचार करतोय. असं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी म्हटलं आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें