Karuna Munde | धनंजय मुंडे दुसरे खरात… करूणा मुंडे यांचे विधान चर्चेत

| Updated on: Apr 15, 2026 | 4:49 PM

भोंदू अशोक खरात भोवती राज्याचं राजकारण फिरत असल्याचे दिसते. या प्रकरणावर आता करुणा मुंडे यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. त्यांच्या विखारी टिकेने एकच खळबळ उडाली आहे.

भोंदू अशोक खरात भोवती राज्याचं राजकारण फिरत असल्याचे दिसते. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खरातशी संपर्कात असलेल्या राजकारण्यांची नावं समोर आणली, कॉल कुंडली बाहेर आणली. राजकीय आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने त्याने मोठे सिडिंकेट उभारले, असे आरोप आहेत. इतकेच नाही तर त्याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले. अनेकांना गंडवले. जादूटोण्याची भीती घालून व्यापाऱ्यांना लुबाडले. या प्रकरणावर आता करुणा मुंडे यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. त्यांच्या विखारी टिकेने एकच खळबळ उडाली आहे.

राज्य महिला आयोगाच्या पद हे राष्ट्रवादीकडे परत गेले तर महिलांना न्याय मिळाणार नाही असा दावा करुणा मुंडे यांनी केला. इतकेच नाही तर, महिला निवृत्त न्यायाधीशाला हे पद मिळायला हवे, अशी मागणी करुणा मुंडे यांनी केली आहे.

‘धनंजय मुंडे हे दुसरे खरात असल्याचा गंभीर आरोप करुणा मुंडे यांनी केला. महिलांवर जितके अत्याचार खरातने केले, तसेच अर्धे अत्याचार धनंजय मुंडे यांनी केले, चांगल्या पत्नीला सोडून दोन महिलांसोबत संबंध ठेवले, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला

Published on: Apr 15, 2026 04:49 PM
Follow Us