Karuna Sharma : ‘मुंडेंची सर्व कुंडली कराडकडे…’, करूणा शर्मांकडून एन्काऊंटरची भीती अन् केला मोठा गौप्यस्फोट
'धनंजय मुंडेंचे 11 नंबर माझ्याकडे आहेत त्या सगळ्या नंबरची सीडीआर काढावी...देवेंद्र फडणीस यांना पाहिजे असेल तर सगळे नंबर देते. एक मंत्र्यांनी 11 नंबर ठेवणं ही छोटी गोष्ट नाही त्या नंबर वरून माझं देखील अनेक वेळा बोलणं झालं आहे', असा गौप्यस्फोट करूणा शर्मा यांनी केला.
‘धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या जोरावर वाल्मिक कराड हा गुंडागर्दी करत होता. धनंजय मुंडे यांची पूर्ण कुंडली ही वाल्मिक कराडकडे आहे. मुंडेची कुंडली बाहेर येऊ नये म्हणून धनंजय मुंडेंच वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करण्यासाठी ऑफर देऊ शकतात.’, असं करूणा शर्मा यांनी म्हटलंय. पुढे त्या असंही म्हणाल्या, रणजीत कासले यांच्यावर अॅस्ट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे, हे कोणत्या व्यक्तीच्या दबावाखाली झालं आहे, याची चौकशी करण्यात आली पाहिजे. कारण यात धनंजय मुंडे याचाच फायदा आहे. मुंडेंकडे अनेकांची कुंडली आहे. या सर्वांची कुंडली मुंडेंनी वाल्मिक कराडकेड ठेवली आहे. ही सर्व राजकारणी आणि सत्ताधाऱ्यांची मोठी खेळी असू शकते, अशी शक्यता करूणा शर्मा यांनी व्यक्त केली. ‘संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा हात आहे, असं मी सांगू शकत नाही कारण माझ्याकडे तसा कोणता पुरावा नाही. पण देशमुख हत्या प्रकरण घडलं तेव्हा रणजीत कासले बीडमध्ये होते. त्यामुळे ते जे दावा करताय त्याची चौकशी करून सत्यता पडळून पाहिली पाहिजे.’, असं मत देखील करूणा शर्मा देखील व्यक्त केली.