Special Report | ‘मातोश्री’ऐवजी पोलीस स्टेशनमध्ये Rana दाम्पत्याची रवानगी

राणा दाम्पत्याविरोधात कलम '153 A' सह विविध कलमं दाखल करण्यात आली आहेत. त्यामुळे राणा दाम्पत्याला आजची रात्र पोलिस ठाण्यातच काढावी लागणार असे सांगण्यात येत आहे. राणा दाम्पत्याला उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.

वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Apr 23, 2022 | 10:32 PM

मुंबई : चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी नवनीत राणा आणि रवी राणा यांना खार पोलिसांनी अखेर अटक केली आहे. शिवसेनेच्या तक्रारीनंतर राणा दाम्पत्यावर खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर खार पोलिसांनी राणा दाम्पत्याला ताब्यात घेत कडेकोट बंदोबस्तात पोलिसांच्या गाडीतून खार पोलिस ठाण्यात आणले. राणा दाम्पत्याविरोधात कलम ‘153 A’ सह विविध कलमं दाखल करण्यात आली आहेत. त्यामुळे राणा दाम्पत्याला आजची रात्र पोलिस ठाण्यातच काढावी लागणार असे सांगण्यात येत आहे. राणा दाम्पत्याला उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें