कोकण म्हणजे तुमचं गुजरात नव्हे – संजय कदम
सोमय्या म्हणून जी दादागिरी करायची असेल ती गुजरातमध्ये करायची इथे कोकणात करायची नाही, कोकणी माणसाच्या मुळावर कुणीही माणूस उठत असेल तर त्याला कोकणी माणूस काय आहे ते दाखवून दिले जाईल असे सांगण्यात आले आहे.
किरीट सोमय्या सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्री मंडळातील मंत्र्यांना ईडीच्या कारवाईचा धाक दाखवत आहेत. त्यामुळे शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते नाराज झाले आहेत. त्यामुळे कोकणातील शिवसेनेचे नेते संजय कदम यांनी किरीट सोमय्यांना आव्हान देत कोकण म्हणजे तुमचं गुजरात नव्हे असे सांगत त्यांनी कोकणात येऊन दाखवावे असा इशारा दिली आहे. किरीट सोमय्या जर कोकणात आले तर शिवसेनेचे सगळे कार्यकर्ते त्यांना शिवसेना काय आहे ते दाखवून देतील असा इशारा त्यांनी दिला आहे. सोमय्या म्हणून जी दादागिरी करायची असेल ती गुजरातमध्ये करायची इथे कोकणात करायची नाही, कोकणी माणसाच्या मुळावर कुणीही माणूस उठत असेल तर त्याला कोकणी माणूस काय आहे ते दाखवून दिले जाईल असे सांगण्यात आले आहे.
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...

