Kishori Pednekar : गोगवलेच रश्मी वहिनींना मध्यस्थी करायला सांगायचे; किशोरी पेडणेकरांचा दावा
Kishori Pednekar Statement On Bharat gogavale : मंत्री भरत गोगवले यांनी केलेल्या विधानावर आता किशोरी पेडणेकर यांनी टीका करत मोठ दावा केला आहे.
भरत गोगवले यांच्यासारख्या व्यक्तीच्या बुद्धीची कीव करावी वाटते असं किशोरी पेडणेकर यांनी म्हंटलं आहे. भरत गोगवले यांचा पॉइंटच चुकलेला आहे. त्यांचं वक्तव्य अधोगतीकडे जाणारं आहे, असंही किशोरी पेडणेकर यांनी म्हंटलं आहे.
भरत गोगवले यांनी शिवसेनेसंदर्भात, ठाकरेंसंदर्भात आणि तिथल्या कारभारासंदर्भात मोठे दावे केलेले आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या नंतरचा कारभार पटला नाही, असंही भरत गोगवले यांनी म्हंटलं आहे. त्यानंतर त्यावर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गोगवले यांचा मुद्दाच चुकला आहे. त्यांच विधान अधोगतीकडे नेणारं आहे. ही लक्षण अधोगतीला पोहोचण्याची आहेत. उलट माझ्या माहितीनुसार हेच जास्त वहिनींना फोन करायचे. साहेब ओरडले तर हेच वहिनींना मध्यस्थी करायला सांगायचे, असा दावा देखील पेडणेकर यांनी केला आहे.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

