कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती पहिला निकाल हाती; पाहा कोण झालं विजयी
Agricultural Produce Market Committee Election Result 2023 : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचा आज निकाल; पाहा कोण आघाडीवर आहे...
कोल्हापूर : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा आज निकाल लागतोय. कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती पहिला निकाल हाती आला आहे. हमाल गटातून बाबुराव खोत विजयी झाले आहेत. बाबुराव खोत 60 मतांनी विजयी झालेत. बाजार समितीसाठी शुक्रवारी 92% इतकं मतदान झालं होतं. 18 जागांसाठी 51 उमेदवार रिंगणात आहेत. आज रमणमळा शासकीय बहुउद्देशीय हॉलमध्ये 36 टेबलवर मतमोजणी होत आहे. बाजार समितीसाठी काँग्रेस राष्ट्रवादी जनस्वराज्य विरुद्ध भाजप शिवसेना अशी लढत होतेय. तर जयसिंगपूर बाजार समितीसाठी आज मतदान होणार आहे. जयसिंगपूर बाजार समितीच्या 18 पैकी सात जागांवर बिनविरोध निवड झाली आहे. 11 जागांसाठी 24 उमेदवार रिंगणात आहेत. आज काय निकाल लागतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
